भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा

dev ad ala | to mi bhogita ugala | avagha nivarala | shin shubhaashubhacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ ॥२॥ अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥