भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊंनियां कपाट । कीं कोण काळ राखों वाट

deunniyan kapat | kin kon kal rakhon vat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देऊंनियां कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥ काय होईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥ करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥२॥ तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥