भजनी मालिका
← भजनांकडे परत

देईल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं

deil ten unen nahin | yache kanhin padarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देईल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥ पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥ गुणां ऐसा भरणा भरी । जो जें चारी तें लाभे ॥२॥ तुका म्हणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥