भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर

deh tanv ase bhogache adhin | yachen sukh sin kshinabhangar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें नसे ॥२॥ तुका म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥