भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे

deh ha sadar pahava nishchit | sarva sukh ethen nam ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥ ब्रम्ह जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥ यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥२॥ तुका म्हणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥३॥