भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें

deh ani dehasambandhen nindavin | itaren vandavin shvanashukaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥ येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥ गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदाझाडां ॥२॥ तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥