भजनी मालिका
← भजनांकडे परत

दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं

davuniyan konan kanhin | te chi vahin chalavilin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥ उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥ दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥ तुका म्हणे पायांसाठी । करीं आटी कळों द्या ॥५॥