भजनी मालिका
← भजनांकडे परत

दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष

dainya duhkh amhan na yeti javali | dahan he holi hoti dosh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥ आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥ आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥ तुका म्हणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हां ॥४॥