भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लांछन

chorachiya dhudaka manin | vase dhyanin lanchhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लांछन ॥१॥ यासी आह्मीं करणें काय । वर्षो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥ ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥२॥ तुका म्हणे त्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥३॥