भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोख्यासाठी देवें बहु नवल केलें

chokhyasathi deven bahu naval kelen

चोख्यासाठी देवें बहु नवल केलें । तयाचें खादलें भात दहीं ॥१॥ म्हणोनी ब्राम्हाणें बांधविला चोखा । सोडविलें देखा तुम्ही त्यासी ॥२॥ तयाचिया मागें आमुचा सांभाळ । कैसा तूं दयाळ करितोसी ॥३॥ कर्ममेळा म्हणे पंढरीरायातें । आतां आहे आमुतें कोण सांगा ॥४॥