भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखियाचे घरा आले नारायणा

chokhiyache ghara ale narayana

रचनाकार: संत बंका · अभंग
चोखियाचे घरा आले नारायणा । होउनी ब्राह्मण दिनें वृध्द ॥१॥ हातामध्ये कांठी सावळा जगजेठी । तुळसीमाळा कंठी बुका भाळीं ॥२॥ कांपत कांपत जातसे चांचरी । मोठा नटधारी घरघेणा ॥३॥ चोखियाचे घर पुसतसे लोकां । वैकुठीचा सखा भक्त काजा ॥४॥ दुरोनियां पाहे चोख्याची अंतुरी । तंव तो आला द्वारी चोखियाच्य़ा ॥५॥ हांसत कांपत मुखाने बोलत । लाळही गळत मुखावाटे ॥६॥ वंका म्हणे पंढरीचा राणा । देखिला नयनां सोयराई ॥७॥