भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं

chintamanideva ganapatisi ana | karavaven bhojana duje patrin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥ देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥ वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राम्हण बैसलेती ॥२॥ तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥