भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं

chatur mi jalon apulya bhonvata | bhavenvin rita sphund angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं ॥१॥ आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धी ॥२॥ तुका म्हणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥