भजनी मालिका
← भजनांकडे परत

चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं

chari ved jayasatin | tyachen nam dhara kanthin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥ न करीं आणीक साधन । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥२॥ गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली ॥३॥ तुका म्हणे सार धरीं । वाचे हरीनाम उच्चारीं ॥४॥