भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंदन तो चंदनपणें । सहज गुणेसंपन्न

chandan to chandanapanen | sahaj gunesampanna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चंदन तो चंदनपणें । सहज गुणेसंपन्न ॥१॥ वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥ परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥२॥ तुका म्हणे कैंची खंती । सुजाती ते टाकणी ॥३॥