भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी

chanchalin chanchal nishchalin nishchal | vajavi khalal udakasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥ सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥ रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥ तुका म्हणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥