भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा

chaliti ad vata | anikan draviti je nita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥१॥ न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥ विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥ बुडतां हाका मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥ तुका म्हणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥