भजनी मालिका
← भजनांकडे परत

चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा

chakrapherin galin gala | hota goviyela mala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥१॥ फुटोनियां गेला कुंभ । झालों निष्काम स्वयंभ ॥ध्रु.॥ धरित चि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥२॥ तुका म्हणे कोडें । आगी काय जाणे मढें ॥३॥