भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं

buddhihina upadesh | ten ten vish amrutin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥ हुंगों नये गोऱ्हावाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥ अळसियाचे अंतर कुडें । जैसें मढें निष्काम ॥२॥ तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥