भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी

bolilon ten atan palaven vachan | aisen punya kon majhe ganthi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥ न घडे यावरी न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥२॥ हाती धरोनियां देवे नेला तुका । जेथे नाही लोकां पराश्रम ॥३॥