भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावे म्हणून बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ

bolave mhanun bolaton upay | pravahen hen jay gangajal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलावे म्हणून बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥ मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांड असुकानें ॥२॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥