भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव

bolava viththal pahava viththal | karava viththal jivabhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥ बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥