भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी

bhutin dev mhanoni bhetaton ya jana | nahin he bhavana naranari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥ दयेसाठी केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥ तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां॥३॥