भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे

bhiun naka bole jhakuniyan raha dole | chalavil dev dhak nahin yenen vele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥ बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी तो ॥ध्रु.॥ पसरूनि मुख विश्वरूप खाय ज्वाळ । सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥ तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥३॥