भजनी मालिका
← भजनांकडे परत

भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे

bhit nahin atan apulya marana | duhkhi hotan jana na dekhave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥ आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥ भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥ तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥