भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरी

bhavikan hen varma sampadalen niken | seviti kavatuken dhanivari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरी ॥१॥ इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥ विसरले मुक्ती भक्तीच्या अभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥ तुका म्हणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥