भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं

bhavanechya mulen antarala dev | shirala sandeh bhay potin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं ॥१॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥ध्रु.॥ न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥२॥ अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥३॥ गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोणाभावें रडती तीं ॥४॥ तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥५॥ मायबापांची तों ऐसी झाली गति । तुका म्हणे अंतीं कळों आलें ॥६॥