भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी

bhav dhari taya taril pashan | durjana sajjan kay kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥ निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥ तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥