भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांबावोनी प्राणी संसारी गुंतले

bhambavoni prani sansari guntale

रचनाकार: संत बंका · अभंग
भांबावोनी प्राणी संसारी गुंतले । माझें म्हणोनि श्रमले भवनदी ॥१॥ नामाची सांगडी न बांधिती कोणी । चौर्‍यांशीची खाणी भोगताती ॥२॥ आपुला आपण झाला असे वैरी । हिंडे दारोदारी भिक मागा ॥३॥ वंका म्हणे नाम सांडोनी विठ्ठल । वाचे बोलती बोल वाउगची ॥४॥