भजनी मालिका
← भजनांकडे परत

भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप

bhale bhanavitan santanche sevak | aityachi bhik sukharup

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥ पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥ तुका म्हणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडता ॥३॥