भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती सुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले

bhakti sukhen je matale | te kilakala shur jale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ती सुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥१॥ हातीं बाण हरीनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥ महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥ सहस्रनामाची आरोळी। एक एकाहूनि बळी ॥३॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥ तुका म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी॥५॥