भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें

bhakti amhi keli sanduni udveg | pavalon hen sang sukh yachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें ॥१॥ सुख आम्हां झालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥ तुका म्हणे सुख बहु झालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥