भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात

bhaktavatsal dinanath | tihin lokin jyachi mat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात॥१॥ तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥ गर्भवास धरी। अंबॠषीचा कैवारी ॥२॥ सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥ तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी॥४॥