भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी

bhaktancha mahima bhakta chin janati | durlabh ya gati anikansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥ अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥ टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥ तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । तीहीं एक्या भावें जाणीतला ॥४॥