भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाठी

bhakta mhanauni vanchaven jiven | tenen shen khaven kashasathi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्त म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाठी ॥१॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥ अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥ तुका म्हणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥