भजनी मालिका
← भजनांकडे परत

बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हें पितळ न देखतां

begadacha rang rahe kon kal | ang hen pital na dekhatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हें पितळ न देखतां ॥१॥ माझें चित्त मज जवळीच ग्वही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥ दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥ तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईल कळों ॥३॥