भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली

baren jhalen deva nighalen divalen | bari ya dushkalen pida keli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥ अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥ बरें जाले देवा बाईल कर्कशा । बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥ बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥ बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥ तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥