भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली कुरवंडी वाळवूनी

bap kari jodi lenkarache odhi | apuli kuravandi valavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली कुरवंडी वाळवूनी ॥१॥ एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥ घालुऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥ तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥