भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो

balen dain na pade hari | buddhi kari shahana to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥ मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥ तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥