भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ माते निष्ठुर होय । परि तें स्नेह करीत आहे

bal mate nishthur hoy | pari ten sneh karit ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळ माते निष्ठुर होय । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥ तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥ नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥ भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥ त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥ नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥