भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती

bal buddhi vechuniyan shakti | udak chalavaven yukti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती ॥१॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥ पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥२॥ बीज ज्यासी घ्यावें । तुका म्हणे तैसें व्हावें ॥३॥