भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसो खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं

baiso khelun jevun | tethen nam tujhen gaun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसो खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥ रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥ विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥३॥