भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइ

baisatan konapen nahin samadhan | vivare hen man te chi soi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइ ॥१॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥ नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥२॥ इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं ॥३॥ एकसरें सोस माहेरासी जावें । तुका म्हणे जीवें घेतलासे ॥४॥