भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां

bahutan janman antin janmalasi nara | dev tun soira karin atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं परतां ॥ध्रु.॥ सांडि कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥ पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरी ॥३॥ विटेवरी नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंदे नामघोषें ॥४॥