भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें

bahutan chhandachen bahu vase jan | naye vantun man tyanchya sangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥ सुखाची समाधी हरीकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥ तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥