भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां

bahuta karuni chalavachalavi | kiti tumhi govi karitasan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥ लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥ दुजियाचा तंव तुम्हांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥ तुका म्हणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥