भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु होता भला । परि या रांडेनें नासिला

bahu hota bhala | pari ya randenen nasila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु होता भला । परि या रांडेनें नासिला ॥१॥ बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥ नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥ ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥३॥