भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु अपराध घडले मजसी

bahu aparadh ghadale majasi

बहु अपराध घडले मजसी । म्हणोनी तुम्हांसी पडली तुटी ॥१॥ आमुचें संचित जैसें जैसें आहे । तैसें तैसें होय आपेआप ॥२॥ तुम्हांसी हो बोल नाहीं नारायणा । आमुच्या आचरणा ग्वाही तुम्ही ॥३॥ कर्ममेळा म्हणे तुम्हांसी बोल । वाया काय फोल वेंचूं देवा ॥४॥