भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा

avaghya papen ghadala ek | upasak shakticha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥२॥ करितां पाप न धरी शंका। म्हणे तुका कोणी ही ॥३॥