भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला

avaghin miloni kolhal kela | atan hota mhanati gela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥ आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥ चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥ तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥